Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रनिलंबित पोलिस कर्मचाऱ्याची ट्रेनखाली आत्महत्या

निलंबित पोलिस कर्मचाऱ्याची ट्रेनखाली आत्महत्या

सेवेतून निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. दिलीप सकपाळे (33) असे मयत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपी पोलिस पुढील तपास करीत आहेत. दिलीप यांना दारूचे व्यसन होते. दिवसरात्र ते दारु पिऊन असायचे. याच कारणातून त्यांना 15 दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. सकपाळे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.

बदलापूरमध्ये राहणारे दिलीप सकपाळे हे कल्याण जीआरपीमध्ये कार्यरत होते. दिलीप हे दिवसरात्र दारुच्या नशेत बुडालेले असायचे. दारुच्या नशेत त्यांच्याकडून गैरवर्तन सुरु होते. तसेच सातत्याने ते ड्युटीवर गैरहजर असायचे. याच कारणातून त्यांना 15 दिवसांपूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. यामुळेच नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली. काल रात्री साडे आठच्या सुमारास कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे मार्गादरम्यान त्यांचा मृतदेह रेल्वे रुळालगत अप लाईनला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दिलीप यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल करीत तपास सुरु केला आहे. एका निलंबित पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -