ताजी बातमी ऑनलाईन टीम
रशियाने यूक्रेनवरील जोरदार हल्ले सुरुच ठेवलेत. तर यूक्रेनकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. दुसरीकडे युद्ध रोखण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. युक्रेन चे राष्ट्रपती यांनी जगभरातील देशांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. वोलदीमीर झेलेंस्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशीही चर्चा करत युद्धस्थितीची माहिती दिली आणि मदतीची मागणीही केली आहे. अशावेळी यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले जवळपास दीड हजार भारतीय विद्यार्थी या युद्धाच्या संकटात यूक्रेनमध्येच अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. हे विद्यार्थी रोमानिया, हंगेरीमार्गे भारतात परतणार आहेत. तर 300 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान रोमानियावरुन भारताकडे रवानाही झालं आहे.
1.
कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले?
पुणे – 77
2. ठाणे – 11
3. पालघर – 7
4. जळगाव – 5
5. बीड – 2
6. सिधुदुर्ग – 6
7. य़वतमाळ – 2
8. परभणी – 6
9. अहमदनगर – 26
10. जालना – 7
11. अमरावती – 8
12. बुलडाणा – 6
13. चंद्रपूर – 6
14. गडचिरोली – 2
15. अकोला – 4
16. सोलापुर – 10
17. उस्मानाबाद – 11
18. भंडारा – 4
19. नागपूर – 5
20. गडचिरोली – 2
21. वर्धा – 1
22. गोंदिया – 3
23. सातारा – 7
24. हिंगोली – 2
25. नागपूर – 5
26. औरंगाबाद – 7
27. नांदेड – 29
28. लातुर – 28
29. रायगड – 26
30. रत्नागिरी – 8
31. सिंधुदूर्ग – 6
32. धुळे – 0
33. जळगाव – 9
34. नाशिक – 7
35. कोल्हापुर – 5
राज्य सरकारकडून हेल्पलाईन जारी
दरम्यान, यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील (Maharashtra) तब्बल 1 हजार 200 विद्यार्थी अडकल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याकडून देण्यात आली आहे. यातील 300 विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांशी संपर्क झाल्याचंही सरकारने सांगितलं. तसंच यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून हेल्पलाईनही जारी करण्यात आलीय.