Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगखासदार संभाजीराजेंची तब्बेत बिघडली, राज्यात ठिकठिकाणी आंदोलने

खासदार संभाजीराजेंची तब्बेत बिघडली, राज्यात ठिकठिकाणी आंदोलने

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करीत आहेत. उपोषणामुळे संभाजीराजे यांच्या शरीरातील ‘शुगर’चे प्रमाण कमी झालं असून, त्यांना अशक्तपणा, डोकेदुखीचाही त्रास जाणवत आहे.

संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली असतानाही, त्यांनी कोणतंही औषधं घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रकृती आणखी बिघडल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.. संभाजीराजे यांची प्रकृती खालावल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.

संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पंढरपूरमध्ये बंद पाळण्यात आला, तर कोल्हापुरात ‘रास्ता रोको’ करण्यात आलं. मनमाडमध्ये कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केलंय. पुण्यातील राजगुरुनगरमधील सिद्धेश्वर मंदिरात महादुग्धाभिषेक करण्यात आला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 18 मराठा समन्वयक व 2 विद्यार्थी गेले आहेत. बैठकीत 22 पैकी 5 मागण्या मान्य करून घ्याव्यात, कायदा हाती घेऊ नये, असे आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -