नशेसाठी कासावीस झालेले नशेखोर कोणत्या थराला जातील, याचा काही नेम नाही. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध देण्यास मेडिकल चालकाने नकार दिला. त्यामुळे दोघांनी केमिस्टच्या दुकानाची तोडफोड केली. कल्याणजवळ असलेल्या बनेली परिसरात हा प्रकार घडला. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोरेक्स औषध देण्यास केमिस्टने नकार दिला होता. नशेच्या आहारी गेलेल्या दोघा तरुणांनी मेडिकलची तोडफोड केली. नशेखोर तरुणांचा हा थयथयाट सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
रिझव्र्ह बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी
रात्रीच्या सुमारास हे दोन तरुण बनेली परिसरात डॉ. आंबेडकर चौक येथील वेलकम मेडिकलमध्ये आले. त्यांनी मेडिकल चालकाकडे कोरेक्स औषध मागितले. मेडिकल चालकाने डॉक्टरच्या परवानगी शिवाय हे औषध देऊ शकत नाही, असं म्हणत डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणण्यास सांगितले.
या दोन तरुणांनी पुन्हा मागणी केली, मात्र मेडिकल चालकाने औषध देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या दोन्ही नशेखोर तरुणांनी मेडिकल चालकाला ठोशा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
मारहाण, शिवीगाळ आणि तोडफोड
दोघे इतक्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी मेडिकलच्या काऊण्टर आणि दोन फ्रिज ढकलून देत तोडफोड केली. काऊण्टर वरील औषधे अस्ताव्यस्त फेकली.