Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगSatara : सातारा जिल्ह्यात वातावरणात बदल, कराडला पावसाची रिपरिप सुरू

Satara : सातारा जिल्ह्यात वातावरणात बदल, कराडला पावसाची रिपरिप सुरू

गेल्या दोन दिवसापासून हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. कराड शहरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील वातावरणात बदल झालेला असून काही ठिकाणी पावसाने सुरूवात केली आहे.

10 वी उत्तीर्णांना संधी – महावितरण मध्ये 120 पदांची नवीन भरती सुरु

कराड शहरात सकाळ- सकाळी पावसाने हजेरी लावल्याने फिरायला येणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या पडत असलेला पाऊस काही भागात पडत आहे, तर काही भागात पडत नसल्याने लोकांना बाहेर पडताना पावसाचा अंदाज लागत नाही. परंतु सर्वत्र वातावरणातील बदल पहायला मिळत आहे.

काल महाबळेश्वर, पाचगणी येथे पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक येत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच ऊस तोडणीला यांचा फटकाही बसणार आहे. महाबळेश्वर, पाचगणी भागात स्ट्राबेरी पिकाला यांचा फटका बसला आहे. तर सध्या नुकतीच बाजारात दाखल होत असलेल्या द्राक्ष बागेलाही फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

धोनी, गांगुली आणि अझहरलाही मागे टाकत मिताली राजचा वर्ल्ड रेकॉर्ड!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -