Sunday, July 6, 2025
Homeमनोरंजनतिच्या प्रेमात पडलो हीच मोठी चूक,अभिनेत्याचा खुलासा

तिच्या प्रेमात पडलो हीच मोठी चूक,अभिनेत्याचा खुलासा

बॉलीवूडमध्ये असे काही स्टार किड आहेत ज्यांना त्यांच्या आई वडिलांसारखी लोकप्रियता मिळालेली नाही. त्यामध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर यांचे नाव घेता येईल. स्मिता पाटील यांनी आपल्या अभिनयानं मोठी उंची गाठली होती.

अद्यापही त्यांची लोकप्रियता कायम आहे. दुसरीकडे त्यांच्या मुलाला प्रतिकला अजूनही बॉलीवूडमध्ये स्वताची ओळख तयार करण्याकरिता संघर्ष करावा लागत आहे. आता तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे त्यांचे झालेले ब्रेक अप.

एमी आणि प्रतिक हे एक दिवाना था या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 2012 नंतर त्यांच्या रिलेशनशिपनं (relationship ) चाहत्यांमध्ये चर्चा होती.

एका मुलाखतीमध्ये प्रतिकनं सांगितलं की, माझ्यासाठी तो काळ मोठा वेदनादायी होता. त्यावेळी मी नैराश्यातच गेलो होतो. माझा एक दिवाना था तेव्हा चांगला चालला होता. त्याला चाहत्यांचा प्रतिसादही मिळाला होता.

त्यावेळी मी एमीच्या प्रेमात पडलो. मात्र मी तिच्या प्रेमात पडणं हीच माझी चूक होती. त्यानंतर काय होणार याची कल्पना काही मला नव्हती. या साऱ्याची किंमत मला चुकवावी लागली. असेही प्रतिकनं सांगितलं होतं. 2019 च्या ब्रेक अपनंतर प्रतिकनं सान्या सागरशी लग्न केलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -