Sunday, March 16, 2025
HomeसांगलीSangli : जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण

Sangli : जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण

सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पुढील चार-पाच दिवस वातावरण असेच राहणार आहे. काही भागात तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सांगली, मिरज शहरासह काही भागात शनिवारी अवकाळीचा तुरळक पाऊस पडला होता. रविवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. अधूनमधून उन्ह पडत होते. सांगलीत तापमानाचा पारा 22 अंशापर्यंत खाली आला होता. सायंकाळी पाऊस पडेल, असे वातावरण झाले होते.

मात्र पाऊस पडला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दि. 25 पर्यंत दुपारनंतर किंवा सायंकाळी ढगांची दाटी होऊन पावसाच्या तुरळक सरींची हजेरी लागण्याची शक्यता आहे. या पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या ऊसतोडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -