ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मेगा आयपीओ(ipo) एकाच दणक्यात बाजारात उतरला आणि गुंतवणुकदारांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत. पुढील आठवड्यात हा आयपीओ शेअर बाजारात सुचीबद्ध होईल. यासाठी सरकारने इश्यू प्राइस निश्चित केली आहे. एलआयसी आयपीओसाठी सरकारने 949 रुपये इश्यू प्राइस निश्चित केली आहे, जी प्राइस बँडची वरची मर्यादा आहे.
याच्या मदतीने sarkarla 20 हजार 557 कोटी रुपये जमा करता येणार आहेत. 17 मे रोजी, ही आयपीओ(ipo) शेअर बाजारात सुचीबध्द होईल. या आयपीओला भुतो न भविष्यती असे जबराट ज्याला इश्यू साइजच्या तीन पट सब्सक्रिप्शन (subscription)मिळाले आहे. आयपीओचे सब्सक्रिप्शन 4 मे रोजी खुले झाले होते आणि 9 मे रोजी ते बंद झाले. 12 मे रोजी या आयपीओचे वाटप करण्यात आले. सरकारने आयुर्विमा कंपनीतील 3.5 टक्के हिस्सा विकला आहे. एकूण 22.13 कोटी शेअर्सवर गुंतवणुकदारांनी बोली लावली.
सरकारने या आयपीओसाठी इश्यू प्राइस 902-949 रुपये निश्चित केली होती. किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 45 रुपयांची सूट देण्यात आली होती. विमा धारकांना 60 रुपयांची सूट देण्यात आली. विमाधारकांसाठी इश्यू प्राइस 889 रुपये आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी इश्यू प्राइस 904 रुपये निश्चित करण्यात आली.
हे आहेत भारताचे टॉप-3 आयपीओ
भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ होता. याआधी 2021 साली पेटीएमचा 18,300 कोटी रुपयांचा मेगा आयपीओ आला होता, जो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ होता. तिसऱ्या क्रमांकावर कोल इंडियाचा 15,500 कोटी रुपयांचा आयपीओ तर त्यानंतर रिलायन्स पॉवरचा 11,700 कोटी रुपयांचा आयपीओ आला आहे.
आयपीओसाठी 73 लाख अर्ज
एलआयसी आयपीओमध्ये ७.३ दशलक्ष अर्ज म्हणजेच ७३ लाख अर्ज आले आहेत. यापूर्वी अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या नावावर हा विक्रम होता, ज्याला 2008 मध्ये 4.8 दशलक्ष अर्ज मिळाले होते.
सोमवारी शेअर्स जमा होणार
ज्या गुंतवणूकदारांना शेअर वाटप मिळू शकले नाही, त्यांना आज परतावा दिला जाणार आहे. सोमवारी, पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. मंगळवारी तो आयपीओ बाजारात लिस्ट होईल. एलआयसीसाठी सरकारने सहा लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन लावले आहे. हे 5.4 लाख कोटी रुपयांच्या एम्बेड मूल्यापेक्षा 1.12 पट जास्त आहे.