Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगUPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी!

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये (UPSC Result Declared) यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्या चार क्रमांकावर मुली आहेत. 2021 च्या यूपीएससी निकालाचे हे मोठं वैशिष्ट्य आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या या निकालामध्ये श्रुती शर्मा (Shruti Sharma) संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. तर अंकिता अग्रवालने (Ankita Agarwal) दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला (Ganima Singh) तर चौथा क्रमांकावर ऐश्वर्या शर्माने (Aishwarya Sharma) बाजी मारली आहे. या निकालात पुण्याच्या अक्षय वखारेनं (Akshay Vakhare) 203 वा क्रमांक मिळवला आहे.



केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in वर UPSC CSE अंतिम निकाल 2021-22 जाहीर केला आहे. रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमी (RCA) मधील श्रृती शर्माने भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. श्रृती सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. श्रृतीच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरुन तिचे कौतुक केले जात आहे.



युपीएससी सीएसईची प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. याचा निकाल 17 मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता. उमेदवारांच्या मुलाखती 5 एप्रिलपासून सुरु झाल्या होत्या. 26 मेपर्यंत मुलाखती घेण्यात आल्या. अखेर आज याचा निकाल जाहीर करण्यात आला. युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -