Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगली : कवलापुरात ट्रकमधून रोकड लंपास

सांगली : कवलापुरात ट्रकमधून रोकड लंपास

आटपाडी येथील मंगेश गंगाधर भिंगे यांच्या ट्रकमधून चोरट्यांनी मोबाईल व 60 हजारांची रोकड लंपास केली. कवलापूर (ता. मिरज) येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश भिंगे यांचा स्वत:चा ट्रक आहे. दोन दिवसांपूर्वी ते ट्रकमधून माल घेऊन परगावी गेले होते. बुधवारी माल उतरून आटपाडीला निघाले होते. त्यांच्याकडे 60 हजारांची रोकड होती. ती त्यांनी चालक सीटखाली ठेवली होती. कवलापूर येथे पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्यांना झोप आली. त्यामुळे त्यांनी ट्रक पंपाजवळ लावला. चालक सीटखाली रोकड व मोबाईल ठेवून ते झोपी गेले. मध्यरात्री चोरट्याने ट्रकमध्ये शिरून रोकड व मोबाईल लंपास केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -