ताजी बातमी ऑनलाईन टीम
बेडगेतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दिनांक 12 जून रोजी बेपत्ता झाली होती ,या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता या अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर साखरा यवतमाळ येथील अजय भिसे या तरुणांची ओळख झाली होती.
झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन लग्नाचे अमिश दाखवून अजय भिसे याने तिला पळवून नेले होते तापसी अंमलदार बळीराम पवार ,उदय लवटे यांनी 15 जून ते 18 जून या कालावधीत नांदेड यवतमाळ ,परिसरात शोध घेऊन सखरा येथून अल्पवयीन मुलगी व आरोपी अजय बाबूराव भोसे वय 24 याला ताब्यात घेतले अल्पवयीन मुलीला लग्नाची फूस लावून बाल लैंगिक अत्याचार केल्याचा अजय भिसे याच्यावर मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे