Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरमहाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे ; कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्याला अटक

महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे ; कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्याला अटक

सातारा जिल्ह्यात सोमवारी एक खळबळजनक घटना घडली.सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेड काढच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) दलातील कर्मचाऱ्यावर पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मगदूम असं गुन्हा दाखल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या महेश मगदूम या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. दरम्यान याबाबत संबंधित युवतीने याबाबतची माहिती फोनवरुन तिच्या आई-वडिलांना आणि तिच्या मित्र मैत्रिणींना दिली. कराड एसटी स्टॅण्डवर बस पोहोचेपर्यंत तिचे मित्र पोलिसांना सोबत घेऊनच तिथे हजर झाले आणि छेड काढणाऱ्याला ताब्यात घेतले.

संबंधित कर्मचारी हा कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहे. कोल्हापूर पोलीस खात्यात तो खेळाडू आहे. सातारा शहरात सुरु असलेल्या पोलिसांच्या स्पर्धेसाठी तो आला होता. या घटनेतील महाविद्यालयीन युवतीने कराड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संशयित आरोपी महेश मगदूम याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने हा गुन्हा बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून आणि ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी महेश मगदूम यालाही बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -