बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. आता दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून सुरू होणार असतानाच, टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
हा खेळाडूही बाहेर..
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हाताच्या दुखापतीमुळे हा दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. तसेच, फास्ट बॉलर नवदीप सैनी हाही दुखापतीमुळे शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. ‘बीसीसीआय’ने ट्विट करून ही माहिती दिली.
बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या वन डेमध्ये कॅच घेताना, रोहितच्या अंगठ्याला बाॅल लागला होता. तो अजून पूर्ण बरा झालेला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी रोहितचा समावेश केलेला नाही. टीम इंडियाची धुरा राहुलच्याच खांद्यावर असणार आहे.
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटी मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. गोलंदाजीत बदल झाल्यास जयदेव उनाडकतचा संघात समावेश होऊ शकतो.