Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाभारताने सामन्यासह मालिका जिंकली, केएल राहुलच्या संयमी खेळीने तारले

भारताने सामन्यासह मालिका जिंकली, केएल राहुलच्या संयमी खेळीने तारले

भारताने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना ४ गडी राखून जिंकला. या सामन्यात भारताची अवस्था बिकट झाली असताना केएल राहुलने संयमी खेळ करत भारताला विजय मिळवून दिला.

केएल राहुलने १०३ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. श्रीलंकेने दिलेल्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली होती. पाचव्या षटकात रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर ठराविक अंतराने बाद झाले.

यामुळे भारताची धावसंख्या १४ षटकात ४ बाद ८६ अशी झाली होती. त्यानतंर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी डाव सावरला आणि ७५ धावांची भागिदारी केली. हार्दिक पांड्या ३५ व्या षटकात बाद झाला. तर केएल राहुलने अखेरपर्यंत झुंज देत अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो सहाव्या षटकात वैयक्तिक २० धावांवर बाद झाला. त्यानतंर कुशल मेंडिसने नुवानिंदु फर्नांडोसोबत अर्धशतकी भागिदारी करत डाव सावरला. मात्र कुलदीप यादवने कुशल मेंडिसला पायचित केलं. तर पुढच्याच षटकात अक्षर पटेलने धनंजय डिसिल्वाला शून्यावर त्रिफळाचीत केलं.नुवानिंदु फर्नांडो धावबाद झाला आणि त्यानंतर दसुन शनाका आणि चरिथ असलांका या दोघांना कुलदीप यादवने बाद केलं. यानंतर २ बाद १०२ वरून श्रीलंकेची अवस्था ७ बाद १५२ अशी झाली. त्यानंतर श्रीलंकेच्या दुनिथ वेलालगेने कसुन रजिथासोबत शेवटी धावा केल्यानं २०० धावांचा टप्पा संघाला ओलांडता आला. मोहम्मद सिराजने दोन तर उम्रान मलिक यांनी दोन गडी बाद केले.

दुनिथ वेलालगे ३२ धावांवर बाद झाला. लाहिरु कुमाराला सिराजने; त्रिफळाचीत केलं आणि श्रीलंकेचा डाव २१५ धावांवर संपवला. पहिल्या सामन्यात दणदणीत विजय पहिल्या सामन्यात विराटचे शतक आणि शुभमन गिल, रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 373 धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेला 306 धावांपर्यंत मजल मारता आली होती. सलामीवीर पथुम निसाकाच्या अर्धशतकानंतर कर्णधार दसुन शनाकाने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज देत शतक केलं होतं. भारत प्लेइंग इलेव्हन रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव श्रीलंका प्लेइंग इलेव्हन नुवानिंदु फर्नांडो, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस , चरिथ असलंका, धनंजय डि सिल्वा, दसुन शनाका, वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसुन रजिथा, दुनिथ वेलालगे, लाहिरू कुमारा,

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -