मिरज येथील कुपवाड रोड म्हसोबा मंदिरामागे राहणाऱ्या कोमल धनंजय सदामते (वय ३०) यांचा अकरा वर्षाचा मुलगा हर्ष धनंजय सदामते याचे अज्ञाताने अपहरण केले आहे. याबाबत कोमल सदामते यांनी मिरज गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मिरजेतील संजय गांधीनगर मराठी मुलांची शाळा येथे हर्ष धनंजय सदामते हा पाचवीत शिकतो. शाळा सुटल्यानंतर तो घराकडे आलाच नाही. त्याची शोधाशोध केली असता तो मिळून आला नाही. शाळेतून घरी येत असताना अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले आहे.