Friday, February 7, 2025
Homeसांगलीसांगलीची प्रतिक्षा बागडी पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी

सांगलीची प्रतिक्षा बागडी पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी

सांगलीत आयोजित केलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची सांगलीचीच प्रतीक्षा बागडी मानकरी ठरली आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटील या महिला मल्लाला तिने नमवले आहे. ७६ किलो वजनी गटात ही कुस्ती खेळली गेली.

राज्यभरातून विविध वजनी गटासाठी ४३ संघ आणि ३०० महिला मल्ल या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. चांदीची गदा आणि ५१ हजार रुपयांचे बक्षीस देऊन प्रतीक्षा चा सन्मान करण्यात आला आहे .तर २५ हजार रुपयांचे बक्षीस वैष्णवी पाटील हिला देण्यात आले आहे. कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, माजी महापौर संगीता खोत,जयश्री पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -