भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज मुरगुड पोलिस ठाण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. हसन मुश्रीफ यांनी सरकारी यंत्रणांचा वापर करुन १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
राज्यपालांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करण्यासाठी आंबेमातेने मला शक्ती द्यावी
भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी काेल्हापूरला आले. येथे अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करण्यासाठी मला शक्ती द्यावी. असे साकडे मी आंबेमातेला घातले आहे. महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी क्रांती सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मित्राला जमीन दिली या घोटाळ्याची सुनावणी सुरु झाली आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणाची सुनावणी सुरु केली आहे, असेही त्यांनी सांगितले. आज त्यांनी मुरगुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सोमय्यांकडून मुरगुड पोलिस ठाण्यात मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -