इचलकरंजी, शहरात आतापर्यंत मोकाट डुक्कर, गाढव, कुत्रा, गायी आदी जनावरे पाहिली आहेत. आता त्यामध्ये नव्याने घोड्यांची भर पडताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना आणखी काय काय पहायला मिळणार? असे उद्विग्रपणे बोलले जात आहे. शिवाय महानगरपालिकेला मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास जमत नसेल तर शहरात प्राणी संग्रहालय उभारावे, असा उपरोधिक टोलाही आता सर्वसामान्य नागरिक तसेच वाहनधारकांतून लगावला जात आहे.
शहरातील मोकाट डुकरांची संख्या काही अंशी कमी होते न होते तोच आता भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच मोकाट गाईंमुळेही वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. चौकाचौकात तसेच शहरात भटकी कुत्री, मोकाट गायी रस्त्याच्या मध्येच बसलेली असतात तर दुसऱ्या छायाचित्रात भरीत वाढू लागल्याने वाहनधारक, नागरिकांना कसरत करावी लागत आहे. मोकाट जनावरे मुख्य रोडवरच दिसून येतात. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते. त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे.
भर म्हणून मोकाट घोड्यांचाही वावर कोपऱ्या कोपऱ्यावर कुत्र्यांचे कळप दिसून येतात. ही मोकाट कुत्री पादचारी, वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. यामुळे अपघात होत आहेत. याशिवाय मोठे तळे, गांधी पुतळा, धान्य ओळ, शॉपिंग सेंटर, जनता बँक परिसर, विकली मार्केट, राजवाडा चौक, थोरात चौक, आवळे मैदान परिसर आदी भागात मोकाट गाईंचा मोठा वावर असतो.
ही अपघाताची मालिका पहाता शहरातील मोकाट कुत्र्यांचा तसेच जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने विविध संघटना, संस्था तसेच नागरिकांतून आजही होत आहे. पण महापालिका प्रशासनास कारवाई करण्यासाठी महूर्त सापडत नसल्याचे दिसून येते. कि राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नाही हे कोडे अद्यापही उलगडले नसल्याचे दिसते. शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्या लगत तसेच खानावळ परिसरात मोठ्या संख्येने मोकाट कुत्र्यांचा वावर दिसून येतो. त्यामुळे
दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास या मोकाट कुत्र्यांकडून पादचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत. यामध्ये लहान मुलांसह महिला अनेक वृध्द देखील जखमी झाले. तरीही ही प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नाही, हे जनतेचे दुर्दैव म्हणावे लागत आहे.
गाई तसेच कुत्र्यांबरोबरच आता मोकाट जनावरांमध्ये घोड्यांची भर पडताना दिसत आहे. सांगली रोडवर ओढा परिसरात अनेक मोकाट घोडी दिसून येत आहेत. सदर
ते संबंधित्वरांना खुराचे आजार झाल्यानेच मालकांकडून सोडून दिल्याचे बोलले जात असले ती यामध्ये चांगल्या जनावरांचाही समावेश आहे. पण महापालिका या मोकाट प्राण्यांचा करेपर्यंत भविष्यात इचलकरंजी प्राणी संग्रहालय बनू नये, अशी भिती नागरिक तसेच वाहनधारकांतून व्यक्त केली जात आहे.
इचलकरंजीत आता मोकाट घोड्यांची भर! वाहनधारक, नागरिक त्रस्त
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -