Saturday, July 5, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजू लागली

इचलकरंजीत सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजू लागली


अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे. यामुळे कुंभार वाड्यात रात्री जागू लागल्या असून मुर्तीवर अखेरचा हात फिरवला जात असल्याचे चित्र आहे. मंडळाचे कार्यकर्ते मंडप घालण्याच्या तयारीला लागले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजू लागली आहेत.

यापार्श्वभूमीवर कुंभार वाड्यात श्री मुर्तीींना अखेरचा हात फिरविला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी श्री मुर्तीचे स्टॉल लागले आहेत. नागरिक घरगुती श्री मुर्ती नोंदणी करताना दिसून येत आहेत. गतवेळच्या तुलनेत यंदा श्री मुर्तीच्या किंमतीत मोठी दरवाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीचे काम कुंभार गल्ली तसेच जुनी नगरपालिका, शाळा क्रं. २, सुंदर बाग, शॉपिंग सेटर परिसर, कलानगर यासह शहरात अनेक ठिकाणी श्री मुर्तीचे स्टॉल लागले आहेत. त्याचबरोबर सजावटीच्या साहित्यांची दुकाने हळूहळू उभारली जाताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -