2024 हे वर्ष बॉलिवूडसाठी देखील खूप चांगले वर्ष ठरलेले आहेम या वर्षांमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट रिलीज झालेले आहेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई देखील केलेली आहे. तसेच प्रेक्षकांच्याही ते सिनेमे चांगलेच पसंतीस पडलेले आहेत. 2024 या वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट रिलीज झालेले आहेत. परंतु त्यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगल्यात जम बसवलेला आहे. आता आज आपण 2024 च्या अखेरीस (Top 5 Hindi movies of 2024) वर्षातील असे काही सिनेमा पाहणार आहोत त्यांनी 2024 मध्ये चांगली बॉक्स ऑफिस कमाई केलेली आहे..
कल्की 2898 AD
नाग अश्विन दिग्दर्शित Kalki 2898 AD हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसन यांसारखी तगडी स्टार कास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. 550 करोड बजेटमध्ये बनणाऱ्या या सिनेमाने जवळपास 1052 करोड रुपयाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे. त्यामुळे हा सिनेमा 2024 मधला एक हिट सिनेमा ठरलेला आहे.
स्त्री 2
स्त्री 2 हा सिनेमा अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या सिनेमांमध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी यांसारखे कलाकार आहेत. या सिनेमाचा पहिला पार्ट प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडलेला होता. त्यामुळे दुसऱ्या पार्टची देखील सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. स्त्री 2 हा सिनेमा 100 करोड मध्ये बनलेला होता. तर या सिनेमाने जवळपास 858. 4 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे.
देवरा पार्ट 1
देवरा या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, जानवी कपूर, सैफ अली खान या कलाकारांनी काम केलेले आहे. हा सिनेमा देखील या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमा होता. या सिनेमाचा दुसरा भाग देखील लवकरच रिलीज होणार आहे. हा सिनेमा 250 करोड रुपयांमध्ये बनवला गेला होता. तर या सिनेमाने 443.8 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे.
भुल भुलैया 3
अनिस अजमी यांनी भुल भुलैय्या 3 हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन फ्रेंचाईज आलेल्या आहेत. या तिसऱ्या फ्रॅंचायजीची सगळेजण उतरतेने वाट पाहत होते. अखेर 2024 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमांमध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित यांसारखे कलाकार होते. हा चित्रपट 150 करोड रुपयांमध्ये बनवला गेला होता. परंतु या सिनेमाने 396.7 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे
पुष्पा 2 द रुल
2024 या वर्षातील पुष्पा 2 हा चित्रपट सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. 2021 साली या चित्रपटाचा पहिला भाग आलेला होता. त्यानंतर दुसऱ्या भागाची सगळ्यात प्रेक्षकांना आतुरता लागलेली होती. 350 कोटी रुपये बजेट असणाऱ्या या सिनेमाने पहिल्या दोन दिवसातच जवळपास 90% बजेट कव्हर केलेले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना हे कलाकार आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 294 कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी 90 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत संपूर्ण जगभरात 400 कोटी रुपयांचा आकडा क्रॉस केलेला आहे. आणि आणखी काही दिवसात हा सिनेमा आतापर्यंतचा सर्वात जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा करणारा सिनेमा ठरणार आहे.