Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रम्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना या 5 टिप्स लक्षात ठेवा; मिळेल चांगला परतावा

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना या 5 टिप्स लक्षात ठेवा; मिळेल चांगला परतावा

सध्या भारतीय शेअर बाजारात (Indian Share Bazar) सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकजण थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भित आहेत. मात्र, असे असले तरीही म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडची निवड अधिक फायदेशीर ठरते, कारण यामध्ये जोखीम तुलनेने कमी असते.

 

महत्वाचे म्हणजे, एकरकमी गुंतवणूक शक्य नसल्यास सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा पर्याय अधिक फायदेशीर ठरतो. SIP अंतर्गत दरमहा ठराविक रक्कम गुंतवून दीर्घकाळात भक्कम संपत्ती निर्माण करता येते. यामुळे अल्प गुंतवणुकीतूनही मोठा परतावा मिळण्याची शक्यता वाढते. परंतु कधीही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी पुढे देण्यात आलेल्या या पाच महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवाव्यात.

 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी पाच महत्त्वाच्या टिप्स

१) योग्य म्युच्युअल फंड निवडा – सर्व म्युच्युअल फंड समान नसतात, त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी फंड व्यवस्थापकाची कामगिरी, खर्चाचे प्रमाण आणि निधीचा ट्रॅक रेकॉर्ड तपासावा. शिवाय, इक्विटी, डेट किंवा हायब्रिड फंडांपैकी आपल्या उद्दिष्टांनुसार योग्य फंड निवडणे गरजेचे आहे.

 

२) स्टेप-अप SIP करा – नोकरी किंवा व्यवसायातून दरवर्षी उत्पन्न वाढत असेल, तर SIP रक्कमही हळूहळू वाढवणे फायदेशीर ठरते. स्टेप-अप SIP च्या मदतीने दीर्घकाळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवता येते, ज्यामुळे परतावा अधिक मिळतो.

 

३) शिस्तबद्ध गुंतवणूक ठेवा – बाजारातील चढ-उतारांच्या काळातही SIP नियमितपणे सुरू ठेवणे आवश्यक आहे. घाबरून गुंतवणूक थांबवणे किंवा कमी करणे नुकसानदायक ठरू शकते. आर्थिक शिस्त राखल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला नफा मिळू शकतो.

 

 

४) पोर्टफोलिओचा नियमित आढावा घ्या – म्युच्युअल फंड गुंतवणूक केल्यानंतर ती विसरण्याची सवय टाळावी. बाजाराच्या परिस्थितीनुसार, फंडाची कामगिरी तपासून आवश्यक ते बदल करावेत. सातत्याने नकारात्मक परतावा देणाऱ्या फंडांऐवजी चांगली कामगिरी करणाऱ्या फंडांची निवड करणे योग्य ठरते.

 

५) SIP लवकर सुरू करा – लहान वयात गुंतवणूक सुरू केल्यास कंपाउंडिंगचा अधिक फायदा मिळतो. त्यामुळे भविष्यात मोठी संपत्ती निर्माण होण्याची संधी वाढते. लवकर सुरू केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम दीर्घकाळात अधिक सकारात्मक दिसतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -