कळंबा येथील ‘स्वप्नव्हिला’ फार्महाऊसवर पोलिसांनी छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत तीन आरोपींना अटक झाली असून सहा महिलांची सुटका करण्यात आली.
पकडलेल्यांमध्ये महिला एजंट फातिमा विजय देसाई (वय 33, राजीव गांधी वसाहत, मार्केट यार्ड), राहुल सुरेश लोहार (33, पेठवडगाव) व परशुराम चवंडू पाटील (45, मलतवाडी, चंदगड) यांचा समावेश आहे.
याशिवाय, फार्महाऊस मालक संदीप अनिलराव कदम आणि इतर काहींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण सात जणांवर कारवाई झाली असून त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास करवीर पोलिस करत आहेत.