Tuesday, September 16, 2025
Homeइचलकरंजीहुपरी गावच्या बाहेर माळी पेट्रोल पंपाजवळ बिबट्याचे दर्शन

हुपरी गावच्या बाहेर माळी पेट्रोल पंपाजवळ बिबट्याचे दर्शन

हुपरी गावच्या बाहेर माळी पेट्रोल पंपाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. हुपरीतील काही गावकऱ्यांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याची कबुली दिली आहे. गावाबाहेरील ओढ्याजवळून उडी मारून हा बिबट्या अंबिकानगरकडील शेताच्या दिशेने गेल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग व स्थानिक प्रशासनाला तात्काळ माहिती देण्यात आली आहे. हुपरीसह रांगोळी परिसर नदीकाठ व मळीकडील भागात बिबट्याच्या हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, सतर्क राहावे व शक्यतो रात्रीच्या वेळी शेतामध्ये किंवा एकांत ठिकाणी जाणे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -