Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रडोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला धक्का! H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल, तब्बल 88...

डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला धक्का! H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल, तब्बल 88 लाख…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे H-1B व्हिसामध्ये मोठे बदल करणार असल्याची जोरदार चर्चा ही मागील काही दिवसांपासून सतत रंगताना दिसली. आता शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला मोठा धक्का दिल्याचे बघायला मिळत आहे. त्यांनी H-1B व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय घेतला असून अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न आता स्वप्न राहण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेत भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात H-1B व्हिसावरच जातात आणि नोकऱ्या करून चांगले पैसे कमावतात. आता H-1B व्हिसासाठी नवीन नियमानुसार मोठे पैसे मोजावी लागणार आहेत. भारत आणि अमेरिकेत अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मात्र, सध्या टॅरिफच्या मुद्द्यामध्ये दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच तणावात असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता थेट नियमात बदल करण्यात आलाय.

 

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसामध्ये बदल करून खळबळ उडवलीये. H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत गैर-स्थलांतरित कामगार म्हणून थेट प्रवेश मिळू शकणार नाही. आता नव्या नियमाप्रमाणे नवीन अर्जासाठी $100,000 म्हणजेच भारतीय रुपयांप्रमाणे 88 लाख रुपयांपेक्षाही जास्त शुल्क भरावे लागेल. नवीन $100,000 शुल्कामुळे कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ होईल. यामुळे कंपन्या या शक्यतो हे शुल्क टाळण्यासाठी स्थानिक लोकांना कामावर घेण्यासाठी भर देतील.

 

88 लाख रुपयांचे शुल्क भरण्यासाठी मोठ्या कंपन्यांना फार काही अडचण नक्कीच नसणार आहे. मात्र, छोट्या कंपन्यांसाठी ही नक्कीच मोठी समस्या बनेल. असे सांगितले जात आहे की, या व्हिसाचा खूप जास्त दुरूपयोग होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत काम करणारी जास्त करून भारतीय लोक याच व्हिसावर गेलेले आहेत. मात्र, आता नवीन H-1B व्हिसा मिळवणे आणि त्यावर अमेरिकेत जाऊन काम करणे म्हणजे मोठे आव्हान आहे.

 

याबद्दल बोलताना व्हाईट हाऊसचे कर्मचारी सचिव विल शार्प यांनी म्हटले की, H-1B नॉन-इमिग्रंट व्हिसा प्रोग्राम हा सर्वात जास्त गैरवापर होणाऱ्या व्हिसापैकी एक आहे. या नियमामुळे अमेरिकन लोकांना काम मिळण्यासही मदत होईल. मात्र, आता H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी ही मोठी समस्या बनली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -