Monday, November 24, 2025
Homeक्रीडाटी 20i-वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, कुणाला संधी-कॅप्टन कोण? जाणून घ्या

टी 20i-वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, कुणाला संधी-कॅप्टन कोण? जाणून घ्या

आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेची तयारी वर्षभराआधीच सुरु झाली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप 2025 स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होत आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने अधिकाअधिक तयारी व्हावी या हेतूने बहुतांश क्रिकेट बोर्ड टी 20i मालिकेचं आयोजन करत आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंकेसह अन्य संघ सध्या आशिया कप स्पर्धेत खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला इतर संघ द्विपक्षीय टी 20i मालिका खेळत आहेत. अशात आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंड दौऱ्यासाठी 24 सप्टेंबरला संघ जाहीर केला आहे.इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

 

इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येकी 3-3 सामन्यांची टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघात 18 ते 23 ऑक्टोबर दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.

 

झॅक क्रॉलीला पहिल्यांदाच संधी

टी 20i मालिकेसाठी पहिल्यांदाच झॅक क्रॉली याला संधी देण्यात आली आहे. झॅकने आतापर्यंत इंग्लंडचं 59 कसोटी आणि 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र जवळपास 6 वर्ष झॅकला टी 20i संघात संधी देण्यात आली नव्हती. मात्र अखेर झॅकची प्रतिक्षा संपली आहे.

 

सॅम करणचं वनडे टीममध्ये कमबॅक

एकदिवसीय संघात युवा ऑलराउंडर सॅम करन याचं पुनरागमन झालं आहे. सॅमने इंग्लंडसाठी शेवटचा सामना नोव्हेंबर2024 मध्ये खेळला होता. तसेच सॉनी बेकर यालाही संधी देण्यात आली आहे. तर जोफ्रा आर्चर याला टी 20i मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

 

टी 20i सीरिजसाठी इंग्लंड टीम : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, सॉनी बेकर, टॉम बैंटन, जैकब बैथेल, जॉस बटलर, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, झॅक क्रॉली, सॅम करन, लियम डॉसन, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट आणि ल्यूक वुड.

 

न्यूझीलंड-इंग्लंड टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 ऑक्टोबर, ख्राईस्टचर्च

 

दुसरा सामना, 20 ऑक्टोबर, ख्राईस्टरचर्च

 

तिसरा सामना, 23 ऑक्टोबर, ऑकलंड

 

इंग्लंडचा असा असणार न्यूझीलंड दौरा

न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड टीम : हॅरी ब्रूक (कॅप्टन), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सॉनी बेकर, टॉम बैंटन, जैकब बैथेल, जॉस बटलर, ब्रायडन कार्स, सैम करन, लियम डॉसन, बेन डकेट, जेमी ओवरटन, आदिल रशीद, जो रूट, जेमी स्मिथ आणि ल्यूक वुड.

 

एकदिवसीय मालिका

पहिला सामना, 26 ऑक्टोबर, बे ओव्हल.

 

दुसरा सामना, 29 ऑक्टोबर, हॅमिल्टन.

 

तिसरा सामना, 1 नोव्हेंबर, वेलिंग्टन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -