Sunday, October 19, 2025
Homeयोजनाशेतकऱ्यांना मिळालं 35 हजार कोटींच गिफ्ट, PM मोदींनी सुरू केल्या 2 खास...

शेतकऱ्यांना मिळालं 35 हजार कोटींच गिफ्ट, PM मोदींनी सुरू केल्या 2 खास योजना

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) शेतकऱ्यांसाठी 35,440 कोटींच्या दोन योजना सुरू केल्या आहेत. ‘डाळ स्वावलंबन अभियान’ आणि ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ अशी या योजनांची नावे आहेत. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पंतप्रधानांवी कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 5450 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. तसेच 815 कोटी रूपयांच्या इतर प्रकल्पांची पायाभरणी केली.

 

डाळ स्वावलंबन अभियान

‘डाळ स्वावलंबन अभियान’ या योजनेवर 11,440 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून 2030-31 सालापर्यंत डाळींचे उत्पादन सध्याच्या 25.238 दशलक्ष टनांवरून 35 दशलक्ष टनांपर्यंत वाढवणे आणि देशाचे आयात अवलंबित्व कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

 

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेवर सरकार 24000 कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात मागास असणाऱ्या 100 जिल्ह्यांचा कायपालट करण्याची सरकारची योजना आहे. ही योजना पीक उत्पादन, वेगवेगळी पीके घेण्यास शेतकऱ्यांना मदत करणे, सिंचन आणि पाणी साठवणूक क्षमता सुधारणे आणि शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यास फायदेशीर ठरणार आहे. दोन्ही योजनांना आधीच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या योजना येत्या रब्बी हंगामापासून 2030-31 पर्यंत चालू रागणार आहेत.

 

विविध प्रकल्पांचे उद्घाटन

आज पंतप्रधानांनी काही प्रकल्पांचे उद्घाटन केले. यात बेंगळुरू आणि जम्मू आणि काश्मीरमधील कृत्रिम रेतन प्रशिक्षण केंद्रे, अमरेली आणि बनासमधील उत्कृष्टता केंद्रे, राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत आसाममधील आयव्हीएफ प्रयोगशाळा, मेहसाणा, इंदूर आणि भिलवाडा येथील दूध पावडर प्लांट आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत तेजपूर येथे मासेमारीचा प्लांट या प्रकल्पांचा समावेश आहे.

 

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

आज पंतप्राधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत विजेत्या शेतकऱ्यांना, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे (पीएमकेएसके) आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्स यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेती, पशुपालन आणि मत्स्यपालनासाची मूल्य साखळी साखळी तयार करण्यासाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह आणि कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी हे नेते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -