साताऱ्यात एम आय डी सी कार मध्ये आढळलेला संशयास्पद मृत्यू देह, पोलिसांकडून घातपाताची शक्यता


सातारा एमआयडीसी येथील बोर फाटा याठिकाणी आज बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कारमध्ये संशयास्पद एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र यशवंत शेलार (वय40 रा. कारंडवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी सातारा शहर पोलीस दाखल झाले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा(Satara) एमआयडीसीत मृतदेह आढळला आहे. त्या कारच्या नजीकच केक कापला आहे. त्यामुळे केक कोणी कापला, कारचालका सोबत कोणी होते का यांचा शोध पोलिस घेत आहेत. परंतु प्राथमिक पाहणीतून हा घातपात असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सातारा पोलीस करत आहे.


घटनास्थळी लोकांनी घटनेची माहीती मिळताच गर्दी केली आहे. संशयास्पद मृतदेह हा चारचाकी गाडी क्रमांक (एमएच-12- एफके- 4840) असा आहे. चारचाकी गाडी रीटस आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group