कोल्हापूर : अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊसच पडला. निवडणूक कार्यालयात अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार व समर्थकांची तोबा गर्दी झाली होती. शुक्रवारी सरपंचपदासाठी 1304 उमेदवारांकडून 1324 इतके अर्ज व सदस्य पदासाठी 8621 उमेदवारांकडून 8719 इतके अर्ज दाखल झाले. यामध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक सरपंचपदासाठी 170 उमेदवारांकडून 172 अर्ज दाखल झाले. तर हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक सदस्यपदासाठी 1242 उमेदवारांकडून 1265 अर्ज दाखल झाले. इच्छुकांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत जल्लोषामध्ये अर्ज दाखल केल्याने निवडणूक कार्यालय परिसराला जत्रेच स्वरुप आले होते. प्राप्त अर्जांवर सोमवारी (दि. 5) छाननी होणार आहे.

जिह्यातील 474 ग्रामपंचायतसाठी 18 डिसेंबरला मतदान व 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांसमोर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईनद्वारे अर्ज स्विकारण्याबाबत दिलेल्या परवानगीमुळे इच्छुकांनी यालाच मोठय़ा प्रमाणात पसंती दिली. यामुळे अखेरच्या दिवशी निवडणूक कार्यालय परिसर गर्दीने फुलून गेल्याचे चित्र होते.

जिह्यात अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी 1304 उमेदवारांकडून 1324 इतके अर्ज व सदस्य पदासाठी 8621 उमेदवारांकडून 8719 इतके अर्ज दाखल झाले. यामध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक सरपंचपदासाठी 170 उमेदवारांकडून 172 अर्ज दाखल झाले. तर हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक सदस्यपदासाठी 1242 उमेदवारांकडून 1265 अर्ज दाखल झाले. आतापर्यंत सरपंचपदासाठी 2677 उमेदवारांकडून 2702 व सदस्यपदासाठी 16520 उमेदवारांकडून 16691 अर्ज दाखल झाले.

Join our WhatsApp group