खंडणीसाठी पती पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. कोल्हापुरातील बोन्द्रेनगर नृसिंह कॉलनीतील प्रकार असल्याचे समोर आले आहे. संबंधित गुन्हेगार हे करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हद्दपार असल्याचेही माहिती आहे. त्याबाबत कुटुंबियांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली आहे.
घटनास्थळी यावरून मिळालेली माहिती अशी की, हद्दपार असलेले उमेश आणि तानाजी कोळापटे गुन्हेगार आणि त्याच्यासोबत काही साथीदार यांनी घरात घुसून पती-पत्नीला मारहाण केली. हे गुंड संतोष बोडके यांच्या टोळीतील असल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. आम्हाला मारहाण करत 10 हजार रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. आमच्या खूप गुन्हे दाखल असून आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, अशी धमकी त्यांनी दिली आहे. मागणीनंतर घरातील प्रापंचिक साहित्याचं नुकसान केले असल्याचे तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.
करवीर मधून हद्दपार असलेल्या गुन्हा गुन्हेगारांची वास्तव्य करवीर मध्येच करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उमेश कोळापटे आणि तानाजी कोळापटे हे हद्दपार आहेत. मात्र अद्याप देखील त्यांचं वास्तव्य हे बोंद्रेनगर परिसरातील नरसिंह कॉलनीतील एका परिसरात असल्याची माहिती तक्रारदारांनी दिलेली आहे. मात्र तरी देखील करवीर पोलीस ठाण्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांना कोणाचा आशीर्वाद मिळतोय असा सवाल स्थानिकांनी केला आहे.