Thursday, June 1, 2023
Homeकोल्हापूरहसन मुश्रीफांभोवती ईडीने आवळला फास; व्यावसायिक भागीदार रडारवर, नातेवाईकांची होणार चौकशी!

हसन मुश्रीफांभोवती ईडीने आवळला फास; व्यावसायिक भागीदार रडारवर, नातेवाईकांची होणार चौकशी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याभोवती ईडीने आता फास आणखी जास्त घट्ट आवळलेला आहे.मुश्रीफांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांना ईडीने समन्स पाठवले आहे. चंद्रकांत गायकवाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे.

मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार आणि आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे सर्वेसेवा चंद्रकांत गाकवाड यांना आता ईडीने चौकशीसाठी ईडीने समन्स बजावलेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. गुरूवार तीस मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहावं असा ईडीने आदेश दिले आहेत.

हसन मुश्रीफ यांची मनी लाँड्रींग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू होती. आता पर्यंत त्यांना तीन वेळा चौकशीसाठी बोलवणयात आले होते. मुश्रीफ यांचे जवळचे जेवढे व्यावसायिक भागीदार आहेत, त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आता चंद्रकांत गायकवाड हे ईडीच्या रडारवर असून, त्यांची कसून चौकशी केली जाईल, असे बोलले जात आहे.

हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावले होते. ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. काही दिवसापूर्वी हसन मुश्रीफ यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी करणयात आली होती.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group