इचलकरंजी नदीवेस परिसरातील बेकादेशीर जुगार अड्ड्यावर धाड ( 33 जण ताब्यात ; दहा लाखाचा मुद्देमाल जप्त)

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येथील नदीवेस परिसरातील सह्याद्री कला, क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्या कार्यालयात बेकायदेशीर तीनपानी व रमी खेळत असल्याच्या कारणावरून अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल ३३ जणांना ताब्यात घेतले. तर सुमारे १० लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबतची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्याठिकाणी तीन पानी व रमी खेळत असल्याचे उघडकीस आले असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,

येथील अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांना नदीवेस परिसरातील एका सह्याद्री कला, क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्या कार्यालयात बेकायदेशीर तीनपाणी व रमी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने रात्री सदर क्लबवर धाड टाकून त्याठिकाणी तीनपाणी व रमी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यानुसार तेथे खेळत असलेल्या ३३ जणांना ताब्यात घेतले तर दोघेजण फरार झाले.

या कारवाईमध्ये २४ मोबाईल जप्त तर २६ हजाराची रोकड आणि तब्बल १६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. असा सुमारे १० लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईवेळी शिवाजीनगर, गावभाग, इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण कक्षाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. सदर सांस्कृतिक मंडळ सलीम लतिफ शेख या नावाने असून सदरचा क्लब अन्य एक राजकीय व्यक्ती चालवत असल्याची चर्चा आहे. सदरची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबतची नोंद करण्याचे काम गावभाग पोलिस स्टेशनमध्ये सुरू होते.

Open chat
Join our WhatsApp group