अजित पवार यांनी दिला हा इशारा, शाळा सुरु करण्याबातही दिले संकेत


कोरोना संपल्याचा गैरसमज करुन घेऊ नका आणि पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी दिवाळीनतंर शाळा सुरु करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.


पुन्हा सर्व बंद करण्याची वेळ आणू नका असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हे विधान केले. कोरोना संपल्यासारखं नागरिक वागत आहेत. कोरोना संपलाय, असा गैरसमज अनेकांनी करुन घेतल्याचे ते म्हणालेत. दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी म्हटले.


कोरोनाचा धोका कायम आहे. नागरिक सध्या निष्कळजीने वागत आहेत, त्यामुळे संख्या वाढण्याची भीती आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. मंदिरे खुली करा, हा भावनिक मुद्दा आहे. यावर आंदोलन करून काही पक्ष काहीजण राजकीय इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे ते म्हणाले.


इतर राज्यांनी शाळा सुरू (Reopen school) केल्या असल्या तरी आम्ही टास्क फोर्सला विचारून निर्णय घेणार आहोत. दिवाळीपूर्वी सुरु कराव्यात किंवा नंतर असे दोन मतप्रवाह आहेत. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
एका प्रश्नावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होत आहे. याचा फटका माझ्या सारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात आहे. मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे. विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, असे यावेळी ते म्हणाले.

Leave a Reply

Join our WhatsApp group