Friday, March 29, 2024
Homeआरोग्यविषयकपुरुषांमधील मेनोपॉज! सेक्स ड्राईव्ह वाढवण्यासाठी युवा घेतायत 'हे' इंजेक्शन

पुरुषांमधील मेनोपॉज! सेक्स ड्राईव्ह वाढवण्यासाठी युवा घेतायत ‘हे’ इंजेक्शन


पुरुषांमध्ये सेक्स ड्राईव्हसाठी टेस्टोस्टेरॉन हार्मोनची मुख्य भूमिका असते. काही अभ्यासांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये वयासोबत या हार्मोनमध्ये घट होताना दिसतेय. अमेरिकेतील वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, 1987 मध्ये 60 वर्षांच्या पुरुषांच्या तुलनेत 2004 मध्ये या वयातील पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर 17 टक्क्यांनी(17 present) कमी असल्याचं समोर आलं.


टेस्टोस्टेरॉन कमी झाल्याचा परिणाम पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. खासकरून सेक्स लाईफवर याचा परिणाम होताना दिसतो. ही समस्या दूर करायची असल्यास युकेमध्ये पुरूष खास टेस्टोस्टेरोन रिप्लेसमेंट थेरेपीचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. या थेरेरीचे रिझल्ट पाहता आता याची मागणी वाढताना दिसतेय.


युकेमधील एका 28 वर्षी मुलाने ही थेरेपी घेतली. या थेरेपीमध्ये मुलाला प्रत्येक महिन्याला इंजेक्शन दिलं जातं होतं. यानंतर या मुलाच्या म्हणण्याप्रमाणे त्याची सेक्स ड्राईव्ह चांगली झाली. शिवाय तो स्वतःला हेल्दी समजू लागला.


कमी टेस्टोस्टेरॉनच्या समस्येचा सामना करणाऱ्या यूकेच्या अॅलिस्टर केनेटने 2018 मध्ये ऑप्टिमल नावाची कंपनी स्थापन केली. ज्या ठिकाणी अशा पुरुषांना टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते. अॅलिस्टर म्हणाला, “आमच्याकडे 27, 28, 26 वर्षांचे अनेक तरुण येतात जे टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेच्या समस्येला तोंड देत आहेत. या सर्वांची रक्त तपासणी केली जाते. जेव्हा हार्मोनची पातळी खूप कमी असते तेव्हा त्यांचे उपचार सुरू केले जातात.


अॅलिस्टेर म्हणाले, ‘बहुतेक पुरुषांमध्ये कमी टेस्टोस्टेरॉनची लक्षणे 30-40 वर्षांमध्ये दिसू लागतात. याला ‘पुरुषांचा मेनोपॉज’ असंही म्हणता येईल. या अवस्थेत, काही पुरुषांना ब्रेन फॉग, लक्ष केंद्रीत करण्यात समस्या आणि कधीकधी शरीरात पुरळ दिसू लागण्याची शक्यता आहे. कारण त्यांचं इस्ट्रोजेन देखील कमी होऊ लागते.


जेव्हा टेस्टोस्टेरॉनची पातळी खूप कमी होते तेव्हा काही पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येला देखील सामोरं जावं लागू शकतं. या व्यतिरिक्त, स्नायू देखील कमकुवत होऊ लागतात. त्याचा मानसिकदृष्ट्याही परिणाम होऊ लागतो. ही समस्या टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी, पुरुषांना योग्य जीवनशैली ठेवण्याचा आणि आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -