सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची बायकोच्या ओढणीने आत्महत्या


रविवारी सायंकाळी गोखलेनगरमधील एका तरुणाने राहत्या घरी पत्नीच्याच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल धोत्रे (वय २९, रा. सुगम मंडळ, गोखलेनगर) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती चतु:श्रृंगी पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल धोत्रे याचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. निखिल धोत्रे यांने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून, त्यात आपल्याला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालो आहे.


माझ्या मृत्यूस तेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ त्याची काळजी घे असे चिठ्ठीत लिहिले आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group