सांगली जिल्ह्यात लम्पीचा पहिला बळी

गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांमध्ये आलेल्या लम्पीस्किीन या आजाराने सध्या सर्वत्र थैमान घातले आहे. लम्पीस्किन आजाराने पलूस तालुक्यातील मोराळे येथील सहा महिन्याच्या वासराचा मृत्यू झाला असल्याची माहिती पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर. एस. माने यांनी दिली. लम्पीस्किन आजाराचा जिल्हयातील पहिलाच बळी पलूस तालुक्यात गेल्याने पशुपालन करणाऱ्या शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली आहे.

लम्पीस्किन या रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. सध्या पलूस तालुक्यात लम्पीस्किन लागण झालेली सहा जनावरे आहेत. त्यापैकी मोराळे येथील रोहीत पाटील यांच्या गायच्या वासराला लागण झाली होती. दि. १० सप्टेंबर रोजी या वासराची पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वासराच्या अंगावर गाठी, ताप येणे, नाकातून व तोंडातून लाळ गळणे यासारखी लक्षणे दिसून आल्याने त्यांनी तात्काळ त्याचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले. त्याचा वैद्यकिय अहवाल गुरुवारी सकाळी सादर झाल्यानंतर सायंकाळी डॉ आर एस. कदम हे तपासणीसाठी गेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाले.

पलूस तालुक्यात लम्पीस्किनची लागण झालेल्या जनावरांची संख्या पाच असून माळवाडी, भिलवडी स्टेशन, सावंतपूर वसगडे या परिसरात असल्याचे त्यांनी सांगितले. लक्ष्मीस्किनने आतापर्यंत पलूस तालुक्यात शिरकाव केला नव्हता मागील काही दिवसापासून या आजाराची लक्षणे असलेली जनावरे आढळू लागली आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लक्षणे दिसू लागताच त्याचे सॅम्पल घेण्यात यावे, रोगाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करून घ्यावे, गोमाशी, गोचीड, माशी, डास यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी औषध फवारणी करून गोटा स्वच्छ ठेवण्यात यावा असे आवाहन डॉ. आर. एस. कदम यांनी केले आहे. लम्पीस्किन या रोगाबाबत पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वेळेत उपचार करून घ्यावेत.

Join our WhatsApp group