कोल्हापुरी गूळ आणि दुग्धजन्य पदार्थासाठी राज्य शासनाने ‘क्लस्टर फॅसिलिटेशन सेल’ स्थापन केला आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली या सेलचे काम चालणार आहे. यामुळे कोल्हापुरी गूळ आणि दुग्धजन्य पदार्थ निर्यातीला चालना मिळणार आहे.
केंद्र शासनाने कृषी निर्यात धोरण जाहीर केले आहे. त्याद्वारे देशातील कृषिमालाची दुपटीने निर्यात वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या निर्यात धोरणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने स्वत:चे निर्यात धोरण तयार केले आहे.
कृषी निर्यात धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती व क्लस्टर स्तरावर काम करण्यासाठी ज्या जिल्ह्यात ज्या शेतमालाचे उत्पादन जास्त आहे, त्या उत्पादनाचे क्लस्टर तयार करून जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ‘क्लस्टर फॅसिलिटेशन सेल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत 18 सदस्यांचा समावेश राहणार आहे.
राज्यातील फळे, भाजीपाला, फुले, तेलबिया, दुग्धजन्य पदार्थ, मत्स्यजन्य, मांसजन्य, मसालेे आदी 20 उत्पादनांचे क्लस्टर तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक क्लस्टरमध्ये ते उत्पादन घेणार्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मात्र, सर्वाधिक उत्पादन होत असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली या सेलची स्थापना करण्यात आली आहे.
त्यानुसार गुळ आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सेल स्थापन केला जाणार आहे.
केळी, फुले, काजू आणि तेलबिया यासाठीच्या क्लस्टरमध्येही कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.
केळीसाठी जळगावला, फुलांसाठी पुण्याला, काजूसाठी सिंधुदुर्ग तर तेलबियांसाठी लातूरला असा सेल निर्माण करण्यात आला आहे.
गूळ, दुग्धजन्य पदार्थांसाठी ‘क्लस्टर फॅसिलिटेशन सेल’ स्थापन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -