राज्यात शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) घेतलेल्या टीईटी परीक्षेचा (TET Exam) निकाल जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यावेळीही निकालाचा टक्का घसरला. ३ लाख १९६२ पैकी केवळ ६४ हजार ८३० परीक्षार्थी सीईटीसाठी पात्र ठरले आहेत.
सध्या सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत शिक्षक भरतीसाठी अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे.राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षण खात्याने (Education Department) दरवर्षी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरवर्षी टीईटी घेऊन शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात टीईटी घेतली होती. यावेळी टीईटीच्या पहिल्या पेपरला १ लाख ४३ हजार ७२०, तर दुसऱ्या पेपरला १ लाख २७,१३१ परीक्षार्थी बसले होते.
मात्र, दरवर्षीप्रमाणे शिक्षक भरतीसाठी पात्र ठरणाऱ्या परीक्षार्थींची संख्या कमी असल्याचे निकालावरून दिसून आले. पहिला पेपर दिलेल्यांपैकी फक्त १४ हजार ९२२, तर दुसरा पेपर दिलेले ४९ हजार ९०८ परीक्षार्थी पास झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात १३ हजार ५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शाळांचे वाटप केल्यानंतर नवीन शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात झाली आहे.आतापर्यंत मूळ कागदपत्रांची तपासणी झालेल्या ५० टक्क्यांहून अधिक शिक्षकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. तसेच नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर नवीन शिक्षक आपल्या शाळेत रुजू होत आहेत. त्यामुळे सरकारी शाळांना दिलासा मिळत आहे. शिक्षण खात्याच्या माहितीनुसार, टीईटी पास होणाऱ्यांची संख्या कमी असली तरी शिक्षक भरतीसाठी सीईटी घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेत गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच शिक्षक भरतीची संधी मिळणार आहे. मात्र, नव्या शिक्षक भरतीसाठी सरकारकडून लवकर हिरवा कंदील मिळणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.सीईटीसाठी पात्र विद्यार्थीपरीक्षा दिलेले एकूण विद्यार्थी ३,०१,९६२पात्र पुरुष १६,२६८पात्र महिला ३३,६३४पात्र तृतीयपंथी ६