Friday, July 4, 2025
Homeकोल्हापूरइटालियन प्राडाला दाखवला कोल्हापुरी हिसका! चप्पलच कोल्हापूरीच असल्याचं केलं मान्य

इटालियन प्राडाला दाखवला कोल्हापुरी हिसका! चप्पलच कोल्हापूरीच असल्याचं केलं मान्य

प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडनं कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह सँडलच्या नावानं बाजारात आणली. मेन्स फँशन शो मध्ये रॅम्पवॉकही झालं.

 

 

याचे व्हिडिओ समोर येताच मात्र महाराष्ट्रासह कोल्हापुरात मोठा विरोध करण्यात आला. यानंतर या विरोधात आता महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरनं यात पुढाकार घेत थेट प्राडाशी संपर्क साधला आणि त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवला.

 

इटली येथील प्राडाचे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी महाराष्ट्र चेंबर्सनं पत्रव्यवहार केला. त्यांना कोल्हापुरी चप्पलेच्या डिझाईन आणि परंपरेबाबत माहिती दिली. त्यानंतर प्राडानं ही कोल्हापुरी चप्पलच असल्याचं जाहीर केलं, अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली. त्यांनी सांगितलं की, प्राडा ग्रुप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी महाराष्ट्र चेंबरला पत्रव्यवहार केला आहे.

 

कोल्हापूरची ओळख आणि अख्ख्या महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापुरी चप्पलेची जगभरात ओळख आहे. अलिकडेच प्राडा नावाच्या या इटालियन फॅशन ब्रँडनं कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. तसेच मेन्स फँशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर केला गेला. ही चप्पल इटालियन असल्याचे भासविले गेले. या प्रकाराने प्राडावर भारतीय सांस्कृतिक वारशाचा गैरफायदा उठवला आहे.

 

प्राडा कोल्हापुरीसारखी चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे. तर, भारतीय कारागीर तीच चप्पल ४०० रुपयांत बनवतात. या संदर्भात कोल्हापुरातील चप्पल बनवणाऱ्या कारागिरांमध्ये नाराजी होती. राज्यातील काही कारागीरांनी या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने लक्ष घालण्याची विनंती केली होती. राज्यातील आणि जगाची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलाची अस्मिता जाणून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीकडं पत्रव्यवहार करुन वस्तुस्थिती मांडली.

 

त्यानंतर प्राडामेन्स २०२५ फॅशन शोमध्ये दाखवलेले चप्पल शतकानुशतके जुना वारसा असलेल्या पारंपारिक भारतीय हस्तकलेच्या चप्पल आहेत. भारतीय कारागिरीचं हे सांस्कृतिक महत्त्व आम्हाला कळालं आहे. जबाबदार डिझाइन पद्धती, सांस्कृतिक सहभाग आणि स्थानिक भारतीय कारागीरांशी अर्थपूर्ण देवाण घेवाणीसाठीचा संवाद उघडण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचं प्राडानं म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा आणि वारशाचा अतुलनीय दर्जा राखणाऱ्या अशा विशेष कारागिरीचं मुल्य प्राडाकडून जपलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -