ताजी बातमी ऑनलाईन टीम
श्रीलंकेचं 184 धावांच लक्ष्य सहज पार केलं
श्रेयस अय्यर नाबाद 74 आणि रवींद्र जाडेजाच्या 45 तुफान फलंदाजीच्या बळावर भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेवर सात विकेट राखून शानदार विजय मिळवला. भारताने तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
धर्मशाळा येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India vs Srilanka) शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) भारताच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी भागीदारी केली. श्रेयसच्या 44 चेंडूत नाबाद 74 धावा आणि रवींद्र जाडेजाच्या 18 चेंडूत नाबाद 45 धावांच्या बळावर भारताने श्रीलंकेवर सात विकेट राखून विजय मिळवला. भारताने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता उद्या होणारा तिसरा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे.
भारताची प्लेइंग इलेवन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह