दाक्षिणात्य सुपरस्टार त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. प्रभासचं सिनमातील काम अनेकांना आवडतं. अनेक तरूणी त्याला पसंत करतात. पण याच सगळ्या मुलींचं मन तोडत नॅशनल क्रश प्रभास आता लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जर प्रभासने खरंच लग्न केलं तर अनेक तरूणींचं मन दुखावलं जाणार हे नक्की…
एका मुलाखती दरम्यान ने आपण बाहुबली प्रदर्शित झाल्यानंतर लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. एका ज्योतिष्याने त्याच्या लग्नाबाबत भविष्यवाणी केली आहे. तिषी विनोद कुमार यांनी प्रभासच्या लग्नाबाबत भविष्यवाणी केली होती. ‘2022 हे वर्ष प्रभाससाठी खूप खास आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याच्या लग्नाचा योग आहे. ऑक्टोबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या काळात प्रभास लग्नबंधनात अडकू शकतो’, असं विनोद कुमार म्हणालेत.
दरम्यान, प्रभासच्या लव्ह लाइफबाबतही याआधी भविष्यवाणी झाली होती. मात्र ती चुकीची ठरली होती. प्रभासने बाहुबली, साहो,महापुरूष अश्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.‘राधे श्याम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभास अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘के’ चित्रपटातही पहायला मिळेल.