Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनवयाच्या 11 व्या वर्षी आलिया पडली होती रणबीर कपूरच्या प्रेमात

वयाच्या 11 व्या वर्षी आलिया पडली होती रणबीर कपूरच्या प्रेमात

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिचा आज तिचा वाढदिवस आहे. आलियाने बॉलिवूडला अनेक दर्जेदार सिनेमे दिले. नुकताच आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने तिला बॉलिवूडची ‘गंगुबाई’ अशी ओळख दिली. आलियाने वयाच्या सहाव्या वर्षी कामाला सुरूवात केली. ‘संघर्ष’ चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून कामाला सुरूवात केली. स्टुडंट ऑफ द इयरमधल्या तिच्या बबली भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. आज आलियाचा 29 वा वाढदिवस आहे. तिच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होतोय. यंदाचा तिचा वाढदिवसही खास आहे. कारण ‘गंगुबाई काठियावाडी’सारखा सुपरहिट सिनेमा बॉक्सऑफिस गाजवत असताना तिचा वाढदिवस साजरा होतोय. पण या सगळ्यात आलियचं पर्सनल आयुष्यही तितकंच चर्चेत आहे.

आलिया आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की रणबीर हे आलियाचं बचपन का प्यार आहे. वयाच्या 11 व्या वर्षी आलिया रणबीरच्या प्रेमात पडली होती.

आलिया आणि रणबीर कपूर मागच्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच आलिया भट्ट आणि रणवीर कपूर लग्न करणार असल्याचीही माहिती आहे. आलियाने एका मुलाखती दरम्यान रणबीर आपल्याला लहानपणीपासून आवडत असल्याचं म्हटलं होतं. आलियाने ‘कॉफी विथ करण’कार्यक्रमात सांगितलं होतं की, “ती 11 वर्षांची असल्यापासून रणबीरवर तिचा क्रश आहे. आलियाने रणबीरला ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या सेटवर पाहिलं होतं. तेव्हा तो संजय लीला भन्साळींसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. तेव्हाच तो मला आवडला होता.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -