Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपाकडून धनंजय महाडिक

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपाकडून धनंजय महाडिक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. भाजपने त्यांचा तिसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सहा जागांसाठी सातवा उमेदवार रिंगणात आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे.


सहा जागेसाठी ही निवडणूक होत असून आता सातवा उमेदवार जाहिर केला आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा लढणार आहेत. आतापर्यंत शिवसेनेने दोन तर भाजपने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना मुंबईत या असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आला आहे. तर त्यांचाही अर्ज भाजपच्या वतीने दाखल करण्यात येणार आहे.



राज्यसभेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार?
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजपने जर धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली तर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवसेनेने या आधीच कोल्हापूरच्या संजय पवारांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -