दरवर्षी गणेश चतुर्थीपासून 10 दिवस साजरा केला जाणारा गणेशोत्सव गणेश भक्तांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा उत्सव असतो. दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला भक्त आपल्या घरात गणपतीची (Lord Ganesh) स्थापना करतात आणि चतुर्थीपासून 10 दिवस गणेशोत्सव साजरा करतात. यंदा तुम्हीही तुमच्या घरी गणेशजींची मूर्ती (Ganesha Murti Tips) आणत असाल तर मूर्ती कशी घ्यायची आणि कोणत्या प्रकारची मूर्ती खरेदी करू नये हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. आजचा हा लेख याच विषयावर (Buying Ganesha Idol) आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे तुम्ही कोणत्या प्रकारची मूर्ती खरेदी करावी हे सांगत आहोत.
मूर्ती घरेदी करताना घ्या ही काळजी
गणेशाची मूर्ती विकत घेताना सर्वात आधी ती व्यवस्थित तपासून पाहावी. श्री गणेशाची सोंड कशी आहे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीच्या मूर्ती खरेदी करताना त्यांची सोंड कोणत्या हाताकडे वळलेली आहे हे पाहावे. गणेशजींची सोंड नेहमी डाव्या हाताकडे वळलेली असावी. मान्यतांनुसार उजव्या बाजूला वाकलेली सोंड तांत्रिक साधनेसाठी वापरली जाते.
अशी मूर्ती करा खरेदी
गणपतीची मूर्ती खरेदी करताना त्यांच्या हातात मोदक आहे की नाही याकडे लक्ष द्या. अशी मूर्ती घरात सुख-समृद्धी आणते. गणेशाची मूर्ती खरेदी करताना त्या मूर्तीमध्ये गणेशाचे वाहन म्हणजेच उंदीर आहे की नाही याकडे लक्ष द्या. मूर्तीमध्ये उंदीराची उपस्थिती खूप महत्त्वाची मानली जाते. गणेशाची उभी मूर्ती सुद्धा खरेदी करू नये. गणपतीची बसलेली मूर्ती शुभ मानली जाते.
घरीच बनवा शाडू मातीची मूर्ती
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाजारपेठ सुशोभिकरणाच्या वस्तू आणि गणपतीच्या मूर्तींनी सजलेली आहे. दहा दिवसांनी गणेश मूर्ती विसर्जन होते या मूर्तींचा पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पूजेसाठी केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचीच निवडवी. अनेक लोक आता घरीच शाडू मातीपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवत आहे. तुम्ही देखील शाडू मातीचा वापर करून घरीच गणेशजींची मूर्ती बनवू शकता.
टीप – या लेखात दिलेली माहिती गृहीतके आणि सूचनांवर आधारित आहे. Taji Batmi याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञाशी संपर्क साधावा.