ताजी बातमी/ऑनलाइन टीम इचलकरंजी, ता. (प्रतिनिधी)-
सामाजिक कार्यात अगे्रसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने पालिकेच्या भगतसिंग प्राथमिक विद्या मंदिर क्र.22 मध्ये पर्यावरण पूरक गणेशमुर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमामध्ये 80 हून अधिक मुले सहभागी झाली होती. या उपक्रमाबरोबरच विश्व साक्षरता दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वही, पेन, पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
बहुतांश गणेशमूर्ती पर्यावरणासाठी हानिकारक अशा साहित्यापासून बनविल्या जातात. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक भगतसिंग विद्या मंदिरात घेण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना लायन्स क्लबतर्फे सर्व साहित्य पुरविण्यात आले होते. तसेच श्रीमती रचना भागेरिया यांनी विद्यार्थ्यांना मुर्ती कशी तयार करावयाची याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ महिला विभागाच्या अंजू बिर्ला, कविता भुतडा, पौर्णिमा भंडारी, संगीता सारडा, कनक भट्टड उपस्थित होत्या.
दरम्यान, साक्षरता दिना निमित्त विद्यार्थ्यांना वही, पेन, पुस्तकांचे वितरण करण्यात आले. लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड यांचे हस्ते व सेक्रेटरी शैलेंद्र जैन, ट्रेझरर महेंद्र बालर तसेच अन्य लायन्स पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला.