नदीवेस विठ्ठल मंदिरासमोरून बुलेट मोटार सायकल चोरी,चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मिरजेतील नदीवेस पवार गल्ली विठ्ठल मंदिरासमोर लावलेली रॉयल एनफिल्ड बुलेट मोटार सायकल क्रमांक एम एच दहा बीडी 66 88 ही 40 हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने पहाटेच्या दरम्यान चोरून नेली आहे सदरची मोटारसायकल दोन चोरटे चोरत असल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे .

याबाबत योगेश प्रल्हाद जाधव वय 42 राहणार नदीवेस पवार गल्ली विठ्ठल मंदिर जवळ मिरज यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांचे विरोधात फिर्याद दाखल केलेली आहे याबाबतच्या पुढील शोध मिरज शहर पोलीस घेत आहेत

Join our WhatsApp group