Friday, February 23, 2024
Homeकोल्हापूरसीपीआर सर्वांसाठी खुले करा: पॉझिटिव्ह रुग्णांचा जोर ओसरला

सीपीआर सर्वांसाठी खुले करा: पॉझिटिव्ह रुग्णांचा जोर ओसरला

कोल्हापुरातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा भर कमी येत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. महिन्याभरापूर्वी दैनंदिन बाधित रुग्णांची दीड ते दोन हजारांच्या दरम्यान असलेली संख्या आता 500 च्या खाली घसरत आहे. शिवाय मृत्यूसंख्याही सरासरी 30 वरून 10 पर्यंत खाली आली आहे. साहजिकच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गेले चार महिने रुग्णांसाठी पूर्णतः वाहून घेतलेल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी (नॉनकोव्हिड) खुले करण्याची वेळ आली आहे.

सीपीआर रुग्णालय नॉनकोव्हिड रुग्णांसाठी तातडीने खुले झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची हेळसांड थांबेल. विशेषतः हृदयरोगावरील उपचारासाठी सध्या सुरू असलेली रुग्णांची परवड थांबणार आहे. सीपीआर रुग्णालय जिल्ह्यातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या कोकण व सीमाभागातील नागरिकांचेही मोठे आशास्थान आहे.

गरिबांचा दवाखाना म्हणून ओळखल्या जाणार्‍या सीपीआरमध्ये दररोज सुमारे 1 हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते. यातील सरासरी 120 हून अधिक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात आणि तेथे विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या सुमारे 100 वर शस्त्रक्रिया केल्या जातात.

जिल्हा प्रशासनाने सीपीआरचे रूपांतर जिल्हा कोव्हिड रुग्णालयामध्ये केल्यानंतर या रुग्णालयाचे दरवाजे नॉनकोव्हिड रुग्णांसाठी बंद झाले होते. यामुळे गेल्या चार महिन्यांत अन्य आजारांच्या रुग्णांनी मोठी फरफट अनुभवली आहे. काहींचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

सीपीआर रुग्णालयाची 650 खाटांची क्षमता आहे. कोरोनासाठी दोन रुग्णांमध्ये अंतर ठेवण्याचे बंधन असल्याने या रुग्णालयाचे 450 खाटांच्या कोव्हिड रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात आले होते. त्यामध्येही म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढले आणि नॉनकोव्हिड उपचार पूर्णतः बंद झाले. आता कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे.

परिणामी, जुलैच्या मध्यावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा 15 हजार रुग्णसंख्येकडे सरकणारा आकडा झपाट्याने खाली आला. सध्या ही संख्या जिल्ह्यात 4 हजार रुग्णांवर आली आहे. यापैकी सीपीआरमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 179 रुग्णांवर येऊन ठेपली आहे. याचा अर्थ रुग्णालयात आता 60 टक्के खाटा शिल्लक आहेत आणि मूळ क्षमतेचा विचार केला, तर 450 खाटांची व्यवस्था नॉनकोव्हिड रुग्णांसाठी होऊ शकते.

E-Paper
पुढारी
शोधा
Switch skin

सीपीआर नॉनकोव्हिड रुग्णांसाठी खुले करा! कोरोनाचा जोर ओसरला
Last Updated: August 14, 2021, 6:52 AM
सीपीआर
कोल्हापूर : राजेंद्र जोशी : कोल्हापुरातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा भर कमी येत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. महिन्याभरापूर्वी दैनंदिन बाधित रुग्णांची दीड ते दोन हजारांच्या दरम्यान असलेली संख्या आता 500 च्या खाली घसरत आहे. शिवाय मृत्यूसंख्याही सरासरी 30 वरून 10 पर्यंत खाली आली आहे. साहजिकच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गेले चार महिने रुग्णांसाठी पूर्णतः वाहून घेतलेल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी (नॉनकोव्हिड) खुले करण्याची वेळ आली आहे.

सीपीआर रुग्णालय नॉनकोव्हिड रुग्णांसाठी तातडीने खुले झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची हेळसांड थांबेल. विशेषतः हृदयरोगावरील उपचारासाठी सध्या सुरू असलेली रुग्णांची परवड थांबणार आहे. सीपीआर रुग्णालय जिल्ह्यातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या कोकण व सीमाभागातील नागरिकांचेही मोठे आशास्थान आहे.

जिल्हा प्रशासनाने सीपीआरचे रूपांतर जिल्हा कोव्हिड रुग्णालयामध्ये केल्यानंतर या रुग्णालयाचे दरवाजे नॉनकोव्हिड रुग्णांसाठी बंद झाले होते. यामुळे गेल्या चार महिन्यांत अन्य आजारांच्या रुग्णांनी मोठी फरफट अनुभवली आहे. काहींचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

सीपीआर रुग्णालयाची 650 खाटांची क्षमता आहे. कोरोनासाठी दोन रुग्णांमध्ये अंतर ठेवण्याचे बंधन असल्याने या रुग्णालयाचे 450 खाटांच्या कोव्हिड रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात आले होते. त्यामध्येही म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढले आणि नॉनकोव्हिड उपचार पूर्णतः बंद झाले. आता कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे.

परिणामी, जुलैच्या मध्यावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा 15 हजार रुग्णसंख्येकडे सरकणारा आकडा झपाट्याने खाली आला. सध्या ही संख्या जिल्ह्यात 4 हजार रुग्णांवर आली आहे. यापैकी सीपीआरमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 179 रुग्णांवर येऊन ठेपली आहे. याचा अर्थ रुग्णालयात आता 60 टक्के खाटा शिल्लक आहेत आणि मूळ क्षमतेचा विचार केला, तर 450 खाटांची व्यवस्था नॉनकोव्हिड रुग्णांसाठी होऊ शकते.

यामध्ये दीर्घकाळ बंद असलेले दंतरोग, त्वचारोग, नेत्ररोग, अस्थिरोग, मनोरुग्ण विभाग आणि जनरल मेडिसीन विभाग सुरू करता येऊ शकतात. सध्या अशा रुग्णांपैकी काही जणांचे आजार अंगावर काढणे सुरू आहे, तर काही जणांना उपचारासाठी खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तेथील उपचार खर्चामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. सीपीआर खुले झाल्यास महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत त्यांच्यावर उपचार होऊ
शकतात.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापुरात बहुतेक मोठ्या रुग्णालयात प्रारंभापासून कोव्हिड आणि नॉनकोव्हिड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. खबरदारी घेऊन राबवलेल्या यंत्रणेत असा संसर्ग पसरल्याचे चित्र कोठेही दिसले नाही. म्हणूनच सीपीआरची संसर्ग पसरण्याची भीती अनाठायी वाटते, ही बाब लक्षात घेतली, तर सीपीआरमध्ये एका इमारतीत कोव्हिड विभाग चालवून अन्यत्र नॉनकोव्हिड उपचार सुरू करता येऊ शकतात.

राज्यात असा उपक्रम सुरू करण्याचा पहिला मान जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाने मिळविला. पाठोपाठ अनेक जिल्ह्यांत नॉनकोव्हिड उपचार सुरू झाले. आता कोल्हापुरातही हे उपचार सुरू करण्याची वेळ आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -