Tuesday, May 21, 2024
Homeआरोग्यविषयकमद्यपींनो सावधान! सांभाळून प्या बिअर, नाहीतर वाढेल रक्तातील यूरिक अ‍ॅसिड

मद्यपींनो सावधान! सांभाळून प्या बिअर, नाहीतर वाढेल रक्तातील यूरिक अ‍ॅसिड

रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे (Uric Acid) प्रमाण वाढणे ही आरोग्यासाठी (Health) गंभीर समस्या आहे. यामुळे तुम्हाला संधिवात (Arthritis), मुतखडा (Kidney Stone) सारख्य अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, युरिक अ‍ॅसिडची सामान्य श्रेणी पुरुषांमध्ये 3.4 ते 7 mg/dL आणि महिलांमध्ये 2.4 ते 6 mg/dL असते. युरिक अ‍ॅसिडची पातळी (Uric Acid Level) कमी झाल्याने देखील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. युरिक अ‍ॅसिडची पातळी 2mg/dL किंवा 1mg/dL पेक्षा कमी झाल्यास मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन आणि मोटर न्यूरॉन सारखे रोग होऊ शकतात. त्यामुळे रक्तातील यूरिक अ‍ॅसिडबाबत माहिती असणे गरजे आहे.

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढणे याला वैद्यकीय भाषेत हायपर युरिसेमिया म्हणतात. यामुळे सांध्यामध्ये स्फटिक किंवा खडे तयार होऊ लागतात. त्यामुळे किडनी स्टोन देखील होऊ शकतो. रक्तातील युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू नये म्हणून आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. युरिक अ‍ॅसिड हा अशा पदार्थामधून तयार होतो ज्यामध्ये प्युरीन नावाचा पदार्थ जास्त प्रमाणात असतो. विशिष्ट प्रकारचे मांस, वाळलेल्या बीन्स, बिअर किंवा वाईन, सीफूड इत्यादींमध्ये प्युरीन्सचे प्रमाण जास्त असते.

सांभाळून प्या बिअर
उन्हाळ्यात लोक बिअर जास्त पितात. यामुळे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते. अशा परिस्थितीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. पाण्यामुळे लघवी पातळ होत शरीराला अतिरिक्त यूरिक अ‍ॅसिड निघून जाते. बिअरसारख्या अल्कोहोलयुक्त पेयांमध्येही प्युरीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बिअर सांभाळून प्या.

गोड पदार्थ
गोड पदार्थ आणि शीतपेय यामुळे यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू शकते. साखरेत फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे साखरचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ आणि शीतपेय टाळावे.

मांस
काही मांसाहार जसे की, प्राण्यांचे यकृत, टाइप स्वीटब्रेड, किडनी इत्यादी विशिष्ट प्रकारचे मांस खाणे टाळा. बीफ आणि हरणाचे मांस यात प्युरीनचे प्रमाण जास्त असते.

रेड मीट
बीफ, डुकराचे मांस, खारवून वाळवलेले डुकराचे मांस यामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. यासह टर्की म्हणजेच दुबळे मांस यातही प्युरीनचे प्रमाण अधिक असते. यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढते.

ज्यूस आणि आईस्क्रीम
सोडा आणि काही प्रकारचे ज्यूस, तृणधान्ये, आईस्क्रीम आणि फास्ट फूड यासारख्या गोष्टींमध्ये उच्च फ्रक्टोज आढळते. तुम्हीही या गोष्टींचे सेवन करत असाल तर तुम्हाला यूरिक अ‍ॅसिडची समस्या होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या गोष्टी टाळा किंवा कमी प्रमाणात सेवन करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -