WhatsApp हे अँप फक्त आपल्या देशात नव्हे तर जगभरात अत्यंत लोकप्रिय आहे. सर्वच युजर्स WhatsApp वर चॅटिंगशिवाय इतरही फीचर्सचा लाभ घेताना दिसतात. यामध्ये इमेज, ऑडिओ, फाइल्सही शेअर करण्याच्या फीचर्सचा समावेश आहे.
काही वेळेस असं काही करत असताना WhatsAppचा गैरवापर देखील केला जातो. WhatsAppच्या बाबतीत काही टीप्स फॉलो करून आपण निश्चितच अशा गैरवापरांपासून किंवा हॅकिंगपासून आपलं अकाउंट सुरक्षित करू शकतो.
WhatsAppमध्ये डिसपिअरिंग मेसेज’ नावाच्या फीचरचा वापर करून आपण निवडलेल्या कालावधीनुसार वैयक्तिक किंवा गट चॅटमध्ये पाठवलेले नवीन मेसेजेस गायब गायब करू शकतो. किंवा आपण ‘व्यू वन्स चा’ फीचरचा उपयोग करून जो फोटो किंवा व्हिडिओ चुकून पाठवला आहे तो त्वरित डिलीट करू शकतो.
आपला चॅटिंगचा एक्सपीरियन्स अधिक सेफ व्हावा यासाठी आपण Account Block फीचरचा उपयोग करू शकतो. जर समजा आपल्याला त्रासदायक मेसेज किंवा काही आपत्तीजनक मेसेज वगैरे आला तर आपण त्यासंदर्भात तक्रार करू शकतो किंवा थेट त्या संपर्कास ब्लॉक देखील करू शकतो.
आपल्यातील कित्येक जण हे आपल्याला आलेला एखादा मेसेज न तपासता किंवा त्याची खात्री न करता फॉरवर्ड करतो. मात्र असं करणं चुकीचं आहे. WhatsApp वर आलेला कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी तो नीट तपासणे महत्त्वाचे आहे.
WhatsAppवरील अनेक मेसेज हे चुकीचे असतात, त्यामुळं सर्व गोष्टींचा तपासून बघाव्यात. WhatsAppच्या युजरकर्त्यांमध्ये भारतात जवळ-जवळ प्रत्येक वयोगटातील लोकं आहेत. प्लॅटफॉर्मवर चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी 10 स्वतंत्र fact Checking संस्थांच्या माध्यमातून Review आणि verification करण्यास मदत करू शकतात.