बोगस लॅबोरेटरी चा वाळवा तालुक्यात सुळसुळाट

शहर व परिसरात बोगस लॅबोरेटरी चा सुळसुळाट सुरू आहे. अनेक लॅबोरेटरी या नियमबाह्य पद्धतीने सुरू आहेत. एखाद्या दवाखान्यात अथवा लॅबमध्ये काम केलेला कर्मचारी उठसुठ लॅब चालू करत असल्याने रुग्णांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यांच्यावर ना आरोग्य विभागाचा धाक व ना कोणतीही कारवाई त्यामुळे लॅब चा नुसता सावळा गोंधळ सुरू आहे.

महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलच्या मान्यताप्राप्त व्यक्तीला क्लिनिकल लॅबोरेटरी चालविण्याचा परवाना दिला जातो.वाळवा तालुक्यात सुमारे 40 हून अधिक लॅबोरेटरी आहेत. इस्लामपुरात 20 ते 25 लॅब आहेत. त्यापैकी केवळ आठ लॅब नोंदणीकृत आहेत. बाकीचे लॅबधारक बोगसपणे काम करत असल्यामुळे त्यांची सेवा घेणार्‍या रूग्णांचा मेडिक्लेम होतच नाही.

Open chat
Join our WhatsApp group