सांगलीत इन्स्टाग्राम ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शहरातील एका सतरा वर्षीय मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी ईस्माईल हारूण नदाफ (वय 23, रा. पन्नास फुटी रस्ता, शामरावनगर) या संशयितास अटक केली. याबाबत पीडितेने नदाफ याच्या विरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयिताने संबंधित मुलीच्या इंस्टाग्राम या सोशल अकाऊंटवर जूनमध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर पीडिताने ती रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांची ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये ऑनलाईन चॅटिंग सुरू झाले.

त्यानंतर संशयिताने लग्नाचे अमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केले. परंतु संशयित केवळ प्रेमाचे नाटक करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित नदाफ याच्याविरोधात बाललैंगिक छळ अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Open chat
Join our WhatsApp group